chief minister

श्री प्रमोद श्रावण तरारे

माननीय धर्मादाय आयुक्त

 

 

परिचय

 

- श्री. प्रमोद एस. तरारे यांचा जन्म दिनांक २१ एप्रिल १९६२ रोजी चंद्रपूर येथे झाला.

 

- त्यांनी त्यांचे शिक्षण चंद्रपूर व हिंगणघाट येथे पूर्ण केले.

 

- दिनांक १७ जुलै १९८९ रोजी त्यांनी वकीलीची सनद घेतली.

 

- त्यांनी वकील म्हणुन गडचिरोली व चंद्रपूर येथील जिल्हा न्यायालयात दिवाणी तथा फौजदारी न्यायालयात तसेच महसुल न्यायाधिकरण यांचेसमोर वकील म्हणुन कामकाज केले.

 

- श्री. तरारे हे दिनांक २ मे २००८ रोजी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश म्हणून न्यायिक सेवेमध्ये रुजु होउन जालना, यवतमाळ, औरंगाबाद, वैजापूर, नागपूर येथे कार्य केले.

 

- तसेच मुंबई येथील सेवाकालावधीमध्ये त्यांनी अतिरिक्त प्रधान न्यायाधिश, शहर दिवाणी व सत्र न्यायालय आणि सी.बी.आय. न्यायालयाचे विशेष न्यायाधिश म्हणुन मुंबई येथे कार्य केले.

 

- दिनांक ३ डिसेंबर २०१८ रोजी जिल्हा न्यायालय, नंदुरबार येथे प्रधान जिल्हा न्यायाधीश म्हणून पदभार स्विकारला.

 

- श्री. तरारे यांनी दिनांक २३ एप्रिल २०२१ रोजी पासुन धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर कार्यरत आहेत.